विशाखापट्टणममध्ये क्रेन कोसळून ११ मजुरांचा मृत्यू

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |
 
 
विशाखापट्टणम : केंद्र सरकारच्या अखत्यारितील िंहदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये एक अवजड क्रेन कोसळल्याने 11 कामगार चिरडले. हा अपघात शनिवारी सायंकाळी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
 
Crane_1  H x W:
 
नौकाबांधणीची उपकरणे हलवली जात असताना हा भीषण अपघात घडला. हे कामगार या कामाचे निरीक्षण करीत होते. यावेळी जमिनीवर क्रेन कोसळल्याचा मोठा आवाज झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
 
हे काम सुरू असताना जवळपास 20 कामगार निरीक्षण करीत होते. क्रेन कोसळत असल्याचे लक्षात येताच काही कामगार सुरक्षित स्थळी धाव घेण्यात यशस्वी झाले. या अपघातात काही कामगार जखमी झाले, तर किमान 10 जण क्रेनखाली चिरडले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी, कोसळलेल्या क्रेनखालून 3 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. अपघातस्थळी शोधमोहीम सुरू करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. जखमी झालेल्या कामगारांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच विशाखापट्टणम्‌चे पोलिस आयुक्त आर. के. मीणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. िंहदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने हे क्रेन दशकभरापूर्वी विकत घेतले होते.