लग्न मंडळींवर फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल

    दिनांक : 09-Jul-2020
Total Views |
 
faijpur_1  H x
 
म्हैसवाडी येथील महिला पोलीस पाटील निलंबित, प्रांताधिकार्‍यांची कारवाई
तभा वृत्तसेवा
फैजपूर, ता. यावल ९ जुलै
यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील महिला पोलिस पाटील प्रफुल्ला गोटूलाल चौधरी यांनी लग्नसोहळ्याबाबत माहिती पोलिस व महसूल प्रशासनास न दिल्याने लग्नातील वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिस पाटील यांना नियम ४ च्या पोटनियम (१) तसेच अ.क्र. २ चे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये प्रधान केलेल्या शक्तीचा वापर करून तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार आदेशाचे तारखेपासून पुढील आदेश पावतो तत्काळ निलंबित करीत असल्याचा आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी काढला आहे.
 
 
यावल तालुक्यातील म्हैसवाडी गांवात एक विवाह समारंभ कार्यक्रम ७० ते ८० लोकांचा जनसमुदायासह कोणतेही सोशल डिस्टंनसिंग न पडता आणि मास्क न लावता पार पडला. विवाहपासून म्हैसवाडी गाव संसर्गजन्य आजाराने १६ ते १७ लोकांना बाधा झाली तर एक व्यक्ती मयत झाली आहे. तसेच विवाहामध्ये ५० पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची माहिती म्हैसवाडी येथील महिला पोलीस पाटील हिने पोलिसांना उशिराने दिल्याच्या कारणावरून फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी महिला पोलीस पाटील प्रफ़ुला चौधरी हिस निलंबित करीत आहे, असा आदेश ८ जुलै २०२० रोजी दिल्याने आणि विवाह संभारंभ करणार्‍यांविरुद्ध गुन्हा टाखल झाल्याने संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्हातील पोलीस पाटील व महसूल कार्यक्षेत्रात आणि पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
 
फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेशा नुसार ७ जून २०२० पासून लग्नसमारंभासाठी फक्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे, असे असताना यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे मच्छिंद्र जयसिंग चौधरी यांचा मुलगा विक्की व त्याचा भाऊ गोरख जयसिंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र यांच्या विवाहास ७० ते ८० लोकांचा जनसमुदायासह कोणतेही सोशल डिस्टंसिंग न पाळता आणि मास्क न लावता पार पडला. दोघांच्या विवाहापासून म्हैसवाडी या गांवात या संसर्गजन्य आजाराने १६ ते १७ लोकांना बाधा झाली. विवाहामध्ये ५० पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्यास पोलीस पाटील यांनी पोलिस यंत्रणेला माहिती देणे अपेक्षित आहे, परंतु वर नमूद दोघं विवाहास ७० ते ८० लोक उपस्थित होते. हे माहीत असताना सुद्धा या कार्यक्रमावर कार्यवाही करणेबाबतची कोणतीही माहिती प्रफुल्ला चौधरी पोलीस पाटील म्हैसवाडी यांनी पोलिस यंत्रणा व महसूल यंत्रणा यांना माहिती दिलेली नाही. याबाबतीत म्हैसवाडी गांवातून पोलिस यंत्रणेला माहिती पडल्यानंतर म्हैसवाडी पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांनी उशिराने २ जुलै २०२० गुरुवार रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस पाटील प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांनी कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारास वेळीच प्रतिबंध न करता व उशिराने गुन्हा दाखल केला म्हणून त्यांच्यावर फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार प्रफुल्ला चौधरी पोलीस पाटील म्हैसवाडी ता. यावल यांना या आदेशाच्या तारखेपासून पुढील आदेश पावतो तत्काळ निलंबित करीत असल्याचा आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिला. माहितीसाठी आदेशाच्या प्रती कार्यकारी दंडाधिकारी यावल, सहाय्यक पोलीस निरीक्षक फैजपूर पोलीस स्टेशन, यांच्यासह यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील महिला पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांना देण्यात आलेल्या आहेत.