कोरोनाचा रिपोर्ट त्वरित मिळावा

    दिनांक : 09-Jul-2020
Total Views |
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
ff_1  H x W: 0  
जळगाव, ९ जुलै
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून तपासणी अहवाल २४ तासात मिळावा. तसेच नॉन कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
 
 
ना. फडणवीस हे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौर्‍यावर आले असून गुरुवारी त्यांनी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयात जावून पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
जिल्ह्याचा कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. संशयितांचे तपासणी अहवाल पाहिजे तेवढ्या प्रमाणावर होत नाही. ते वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्यात आहेत. तपासणी अहवाल उशीरा येत असल्याने रूग्णांची प्रकृती खालावली जाते. त्यामुळे स्वॅब घेतल्यापासून २४ तासात तपासणी अहवाल आला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी केले.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, आ.सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल, आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते.
 
 
रूग्णवाहिकेची कमतरता
गेल्या महिन्यात कोरोनाबाधित वृध्द महिलेचा मृतदेह शौचालयात आढळून आला होता ही खेदाची गोष्ट आहे. त्यानंतरही सुधारणा समाधानकारक झालेल्या नाहीत. जिल्हा कोवीड रूग्णालयात रूग्णवाहिकांची कमतरता असल्याने जामनेर तालुक्यातही रूग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. यासाठी तात्काळ रूग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशाही सूचना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत.
 
 
नॉन कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा
जिल्हा रूग्णालय पूर्णपणे कोविड रूग्णालय असल्याने नॉन कोविड रूग्णांची मोठ्या प्रमाणावर फरफट होत आहे. अशा रूग्णांना जळगावपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. सामान्य रूग्णास वेळेत पोहचणे शक्य नाही. तसेच गोदावरी हॉस्पिटल संदर्भातही अनेक तक्रारी आहे. गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये सामान्य रूग्णाला मोठ्या प्रमाणावर लुट केली जात आहे. यासाठी जिल्हा रूग्णालयातच एक स्वतंत्र यंत्रणा उभारून नॉन कोविड रूग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, अनेक किरकोळ गोष्टी पूर्ण करण्यासंदर्भात सूचनाही आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या.