कोरोना कहर : जिल्ह्यात आढळले २९२ नवे रुग्ण

    दिनांक : 09-Jul-2020
Total Views |
जळगाव शहरात ८२ बाधित, जामनेरसह मुक्ताईनगर तालुक्यात मोठा संसर्ग
  

corona_1  H x W 
 
जळगाव, ९ जुलै
जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून गुरुवारी २९२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक ८२ रुग्ण जळगाव शहरातील असून जामनेरमध्ये ३३ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील ३१ रूग्णांचा समावेश आहे.
 
 
जिल्हा माहिती कार्यालयानुसार, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण २९२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ८२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तसेच जामनेर ३३, मुक्ताईनगर ३१, पारोळा १४, पाचोरा १, चाळीसगाव १७, रावेर ८, बोदवड १९, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १८, भडगाव १, धरणगाव ४, यावल १४, एरंडोल १७ आणि अन्य जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.
 
 
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५ हजार ३०२ इतका झाला आहे. त्यातील ३ हजार ७९ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ९१४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर गुरुवारी जिल्ह्यात एकूण ८ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ३०९ झाली आहे.
 
जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ व अमळनेरात सध्या सक्तीचा लॉकडाऊन सुरू आहे. यात जळगावमध्ये दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत चालली असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. जळगाव शहरातही रूग्ण संख्येचा स्फोट होऊन तब्बल ८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.