दंडवतेंचा अतिरिक्त पदभार पवार यांच्याकडे

    दिनांक : 09-Jul-2020
Total Views |
 
mnpa_1  H x W:
 
जळगाव, ९ जुलै
मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. त्यामुळे त्यांचा पदाचा अतिरिक्त कार्यभार मुख्यलेखाधिकारी कपिल जयकर पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
 
 
प्रशासकीय कारणास्तव दंडवते यांचे बदलीचे आदेश ७ रोजी प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ रोजी कार्यमुक्त होऊन ते जामखेड येथे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहे. त्यामुळे उपायुक्तपदाचा (सा.प्र.) कार्यभार कपिल पवार यांच्याकडे असल्याचा आदेश गुरुवारी आयुक्तांनी काढला आहे. त्यानुसार आरोग्य विभागासह वाहन विभाग, अग्निशमन, आस्थापना, नगरसचिव, शिक्षक, बालवाडी, एन.यु.एल.एम., जनसंपर्क, अभिलेखा, टेलीफोन, जाहिरात, बारनिशी, जनगणना व निवडणूक, विधी, महिला व बाल कल्याण, दवाखाने, क्रीडा विभाग तसेच साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय, संकीर्ण, पर्यावरण विभागाचा ते स्वतःचे काम सांभाळून अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.