कृत्रिम खतटंचाईविरूद्ध कृषी अधिकार्‍यांना घेराव

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
 
 
 
चोपडा : कृत्रिम खत टंचाई व चढ्या दराने विक्री यामुळे शेतकरी त्रस्त आहे. ही समस्या त्वरित संपावी म्हणून चोपडा शहर व तालुका कॉंग्रेसतर्फे तहसीलदार अनिल गावित यांना तालुका अध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के.डी.चौधरी, महेमूदअली सय्यद, कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत शांताराम साळुंखे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
 

Chopda Khat_1   
 
निवेदनावर मार्केट कमिटी माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, शेख अ .हमीद वाहेद , कांतिलाल सनेर, तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, नरेंद्र पाटील, कलींदर तडवी, फकिरा पाटील, जिजाबराव पाटील, संजीव सोनवणे, दिलीप पाटील, बागुले , गणेश धनगर, सुनील बागुले, वासुदेव बागुल, देवानंद शिंदे, रमेश पाटील, रमेश शिंदे, मधुकर बाविस्कर, सोपान पाटील, एन एस यू आर अध्यक्ष चेतन बाविस्कर, फातिमा पठाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदन देतांना राष्ट्रवादीचे नगरपरिषदेचे गटनेते जीवन चौधरी यांनी उपस्थिती देऊन सहमती दर्शवली. तहसीलदार यांच्या उपस्थितीत कृत्रिम खत टंचाई व वाढत्या दराने शेतकर्‍यांची होणारी लूट याबाबत राजाराम पाटील, के.डी.चौधरी, शशिकांत साळुंखे, उपस्थित शेतकरी यांनी प्रश्न केले.