समोरासमोर दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
जळगाव विमानतळाजवळ घडली घटना
accident_1  H x 
 
जळगाव, ८ जुलै
दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघात एका दुचाकीवरील तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा विमानतळ येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
 
प्रितेश सुरेश रायपुरे (४४, रा. सुप्रीम कॉलनी) हा दुचाकीने (क्र. एमएच १९ एवाय ८६२६) कामानिमित्त विमानतळ समोरून जात असतांना दुपारी समोरून येणार्‍या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रितेश रायपुरे याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरील विकास चंपालाल बारेला (रा. विमानतळ जवळ) हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. मयत प्रितेशचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
 
 
पोलिसांकडून मदत
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इमरान सय्यद, निलेश पाटील, मुदस्सर काजी, असीम तडवी, कुसुंबा पोलीस पाटील राधेश्याम पाटील अशांनी जखमीला उपचार कामी ऍम्बुलन्स न मिळाल्यामुळे रिक्षामध्ये टाकून पाठवले होते. पुढील कारवाई पो.कॉ. रतिलाल पवार करीत आहे.