खंडवा स्थानकाचे डीआरएम यांनी केले निरीक्षण

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
 
 
भुसावळ : भुसावळ-विभागाचे डिआरएम अर्थात विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी विभागातील सर्व शाखा अधिका-यां सोबत भुसावळ विभागातील खंडवा स्थानकाचे निरीक्षण केले. या निरीक्षणत स्थानक निरीक्षणसह बाहेरील परिसर आणि खंडवा माल गोदामाची पाहणी केली.माल गोदामात सामान आणणे व परत घेऊन जाण्याचे प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी सुचना देण्यात आली. माल गोदामातील गेटचे काम आणि ट्रकला येण्या जाण्यासाठीचा पक्का मार्ग जुना ८ मीटरचा रोड़ हा १० मीटर रुंदी वाढविण्यासंबंधी सुचना देण्यात आली.
 
 
BSL_DRM_1  H x
 
या पाहणीत वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले,वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) निसितकुमार मल, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, मुख्य वाणिज्य निरीक्षक (खंडवा) एन.के. शर्मा व अधिकारी तथा सर्व कर्मचारी पाहणी दरम्यान उपस्थित होते.