कोरोना योद्धे, ग्रा.पं.कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदेवर उद्या धरणे आंदोलन

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
 
 
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किरोना योद्धा यांना गेल्या चार महिन्यापासून महाराष्ट्र सरकार कडून मिळणारे पगाराचे अनुदान व सुधारित परिपत्रकप्रमाणे सर्वांना शंभर टक्के अनुदान पगार मिळालेले नाही दरमहा कधी सर्वर काम देत नाही कधी बँक बदल,संबंधित अधिकारी रजेवर अशा काहींना अडचणी सांगून तसेच ग्रामपंचायतींनी राहणीमान भत्ता अदा केलेला नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारीच विचारच करीत नाही एव्हढे निष्ठुर झाले की काय? मध्येच सरकारने.७४ कोटी रुपये पगारासाठी मंजूर केले. प्रत्यक्षात थकीत पगार काही होत नाहीत म्हणून या कोरोना योद्धा ग्रामपंचायत कर्मचारीच पगारासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदेवर येत्या १० जुलै शुक्रवारी सकाळी ११ वा. फिजिकल डिस्टन्स ठेवून व मास्क बांधून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे.
 

Jalgaon_ZP_Logo_1 &n 
 
 
कर्मचार्‍यांनी या आंदोलनात मिळेल त्या वाहनाने येऊन हजेरी लावावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक चे राज्य सचिव अमृत महाजन, जिल्हाध्यक्ष संतोष खरे, रतिलाल पाटील, कौरव पाटील, तुषार मोरे, मलखान राठोड, संदीप देवरे, किशोर कंडारे, गिरीश माळी, शंकर दरी, कन्हैयालाल खंडारे, पिंटू पाटील, पिंटू साळुंखे, राजू कोळी, शिवशंकर महाजन आदींनी केले आहे.