रावेर तालुक्यातील ५८ गावांची मदार ४२ पोलिसांवर

    दिनांक : 07-Jul-2020
Total Views |
 
 
पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज, रावेर शहरासह सात गावे अतिसंवेदनशील
 
 
रावेर : रावेर शहरासह ५८ गावांची मदार फक्त ४२ पोलिसांवर असल्याने येथे वारंवार कायदा- सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होत असतो. रावेर दंगलीच्या दलदलीतून रावेर पोलिस स्टेशनचे रामदास वाकोडे प्रशासन बाहेर येताच कोरोनाच्या कृपेमुळे कंटेन्मेंट झोनला बंदोबस्त पुरवणे, लॉकडाऊनचे नियम पाळणे तसेच गुन्हेगारीवर देखील तेवढाच वचक ठेवल्याने चोर्‍या, घरफोड्याच्या गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे.
 
 
Raver Police Station_1&nb
 
 
विशेष म्हणजे येथे असलेले पोलिसांचे अपुर मनुष्यबळ कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व आघाडयांवर खिंड लढवताय.तसेच प्रत्येक पोलिसांच्या आरोग्याची देखिल विशेष काळजी घेतली जात आहे.म्हणून कोरोना व्हायरस सुध्दा रावेर पोलिस स्टेशन पासुन लांब आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षीका भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे दररोज आपल्या पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांची पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करतात त्यांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देतात.
 
 

Raver Police Station2_1&n
 
 
लॉकडाऊनपासून गुन्हेगारीत घट
२१ मार्चला कोरोना लॉकडाऊन लागल्यापासून रावेर दंगल सोडली तर इतर गुन्हेगारींमध्ये प्रचंड घट झाली आहे. मागील चार महिन्यांमध्ये तीन घरफोडी झाल्या आहेत. त्यापैकी दोन घरफोड्याचा तपास लागला आहे. १५ चो-या झाल्या असून त्यापैकी चार चोर्‍या रावेर पोलिसांनी उघड केले आहे. इतर गुन्हांचे प्रमाण कमी झाले आहे. हे सर्व पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या ४२ शिलेदारांच्या कामकाजामुळे शक्य झाले आहे.
 
 
अपुरी संख्याबळ ठरतेय डोकेदुखी
रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत रावेर शहरासह तब्बल ५८ गावे येतात येथे कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मदार ४२ पोलिसांवर आहे. यामध्ये एक पोलिस निरिक्षक एक साह.पोलिस निरिक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक तर ४२ पोलिस कर्मचारी असल्याने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडत असते.
 
 
सात गावे अतिसंवेदनशील
रावेर शहरात नुकतीच दंगल घडली असून शहर प्रचंड संवेदनशील असून इतर रसलपुर, आहिरवाडी, कुसुंबा, मोरगाव, पाल आणि ख़िरवड ही गावे देखिल संवेदनशिलमध्ये येतात. मध्यप्रदेशची पूर्वीकडून चोरवड सिमा तर उत्तरेकडून पाल सिमा याच रावेर पोलिस स्टेशनला लागून आहे.
 
 
पोलिसांची संख्या वाढण्याची गरज
रावेर पोलिस स्टेशनला मध्य प्रदेश सिमा लागुण असल्याने येथे गुन्हेगारीचे प्रमाणात देखिल तेवढेच आहे.अनेक वेळा सामाजिक तेढ सुध्दा निर्माण होतात. यातूनच कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो म्हणून येथे कमीत-कमी ६० पोलिसांची संख्या आवश्यक आहे.