धडगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

    दिनांक : 07-Jul-2020
Total Views |
नंदुरबार जिल्ह्यात आज आढळले ५ रुग्ण
 
 
धडगाव : नंदुरबार जिल्हयात पुन्हा ५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यात नंदुरबार २, अक्कलकुवा २, धडगांव येथे एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता ४१ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १६० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत धडगांव तालुका कोरोनापासून लांब होता. मात्र आता धडगांव तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे.
 
 

Corona _1  H x  
 
प्रशासनाला अहवाल प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यातील ५ जणांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात नंदुरबार शहरातील हुडको कॉलनी ३२ वर्षीय पुरूष, राजीव गांधी नागरातील ३८ वर्षीय पुरूष, अक्कलकुवा येथील पोलीस लाईन येथील ७५ वर्षीय महिला,१६ वर्षीय युवकाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाच्या छायेपासुन दुर असलेल्या धडगांव तालुक्यात ही कोरोनाने शिरकाव केला आहे. धडगांव तालुक्यातील गेंदामाळ पो.चिखली येथील ४२ वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार १५१ संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार ७८० रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. १९५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात ४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. येत्या दोन दिवसात हे सर्व अहवाल प्राप्त होणार आहेत.