लोहटार येथे एकाने घेतलालिंबाच्या झाडाला गळफास

    दिनांक : 30-Jul-2020
Total Views |
 
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवासी दिलीप मंगा सोनवणे (५५) हा शेतात बकर्‍या चारावयास गेला असता दुपारी तीन वाजेपुर्वी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मयत झाला.
 
या घटनेची खबर मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे व सूर्यकांत नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यास पोलीस पाटील जगदीश रतन पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केल्याबाबतची खबर पाचोरा पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी दिल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
मयतावर पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या आत्महत्येचे कारण समजून शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहे.