वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा हात

    दिनांक : 30-Jul-2020
Total Views |

jalgoan_1  H x

ओजस्वी माळीचा कौतुकास्पद उपक्रम, अनाथांना जेवण
जळगाव : शहरातील बारा वर्षीय चिमुकलीने आपल्या वाढदिवसावर खर्च न करता विविध सामाजिक उपक्रमावर केला. ओजस्वी माळी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजूंना किराणा कीट व जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले. तिच्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून त्या रक्कमेतून तिने गरजूंना थेट मदत करुन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. ओजस्वी हि जळगाव येथील पोलीस बिनतारी संदेश विभागातील अमित माळी, माधवबाग हॉस्पिटल जळगावच्या संचालिका डॉ.श्रद्धा माळी यांची कन्या आहे.
 
ओजस्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी कृती फांउडेशन व नि:स्वार्थ जनसेवा फूड बँकेच्या सहकार्याने अनाथालयातील आजी-आजोबा , गतिमंद मुलाच्या विना अनुदानित निवासी शाळेस आर्थिक मदत देण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन, नेहरु चौक,बसस्थानक, सिव्हील हॉस्पिटल, टॉवर चौक आदी ठिकाणी जेवण वाटप करण्यात आले. ग्रामिण भागात पावसाळ्याचे दिवस असल्याने एका घरावर पत्रे नसल्याचे ओजस्वीने पाहिले, त्यासाठी तिने वाढदिवशी इतर खर्च न करता आई वडिलाकडून याठिकाणी मदतीचा तिने संकल्प केला. त्यानुसार तिच्या संकल्पाने एका घराला कोरोना काळात निवारा मिळाला आहे.
 
सध्या कोरोनामुळे उद्योग , रोजगारावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही. मात्र ओजस्वीचा उपक्रम जिल्हावासीयांना नक्कीच प्रेरणा देणारा आहे. त्याचप्रमाणे मेहरूण तलाव परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी डॉ.श्रद्धा माळी, डॉ.श्रेयस महाजन, श्रुती महाजन, धिरज जावळे, सागर गोयर, जी.टी. महाजन, सरिता महाजन आदी उपस्थित होते.