कोविड अनलॉक 3 : मॉल्स, व्यापारी संकुले, जिम 5 ऑगस्टपासून खुली

    दिनांक : 30-Jul-2020
Total Views |
 
मुंबई - ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सरकारने पुढच्या टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने ही कोविड अनलॉक 3 ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 5 ऑगस्टपासून मॉल्स, व्यापारी संकुले, जिम, दुकाने, कॉम्प्लेक्स, आऊटडोअर खेळांबरोबर खासगी वाहनांमधून प्रवासराला परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी 9 ते सांयकाळी 7 यावेळेत सुरू राहतील. मात्र मॉल्समधील थिएटर, फूड मॉल सुरू करता येणार नाहीत. फूड मॉल्समधील हॉटेल्स फक्त घरपोच भोजन देऊ शकतील.
 
 
UNLOCK_1  H x W
  •  टाळेबंदी शिथिलीकरणाचा तिसरा टप्पात रात्रीची संचारबंदी मागे
  •  राज्यात मॉल्स आणि व्यापारी संकुले 5 ऑगस्टपासून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  •  करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत.
  •  मॉलमधील उपाहारगृहे, चित्रपटगृहे मात्र बंदच राहतील.
  •  व्यायामशाळांना केंद्राची परवानगी, राज्याची मनाई
  •  वाहनांतील प्रवासी संख्येत वाढ
  •  जिल्हाअंतर्गत प्रवासावर निर्बंध नसतील.
  •  मुंबई महानगर क्षेत्र वगळता इतरत्र
  •  आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक असेल.
               तसेच केंद्र सरकारने 31 ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यातही शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेण्यात येणार आहे.
 
 
मुंबईसह 18 महापालिकांमध्ये निर्बंध लागू
 
 
  •  राज्यात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. हे निर्बंध मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली लागू करण्यात आले आहे.