दक्षिण काशी प्रकाशा येथून जल, मातीचा कलश अयोध्येला रवाना

    दिनांक : 29-Jul-2020
Total Views |
 
 
तळोदा : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या भव्य मंदिर बांधकामाच्या भूमिपूजनासाठी देशभरातून पवित्र नद्यांचे जल पोहचवले जात आहे. दक्षिण काशी म्हणून प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या प्रकाशा तालुका शहादा जि नंदुरबार येथून नद्यांच्या त्रिवेणी संगमातून पवित्र जल भरून कलश पाठविण्यात आला आहे.
 
 
Taloda_1  H x W
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद तसेच गोरक्षा समितीचे कार्यकर्ते यांनी प्रकाशा येथे तापी, गोमाई व पुलींदा या तीन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झाला त्या जागेवर जाऊन तापी नदीच्या पात्रातून पवित्र जल घेऊन कलश भरला. नंतर संगमेश्वर या ठिकाणी धार्मिक पूजा विधी, मंत्रोच्चार करण्यात आले पवित्र जलाने तसेच माती व रेतीने भरलेल्या कलशाला वंदन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष धीरूभाई पाटील, जिल्हा मंत्री विजय सोनवणे, राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक संजय पुराणिक, सहमंत्री अजय कासार, खुशाल पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा, जिल्हा सेवा प्रमुख धनंजय बारगळ, जिल्हा गौरक्षा समितीचे प्रमुख राजा साळी, जिल्हा मठ मंदिर प्रमुख आर आर मगरे, जिल्हा सत्संग प्रमुख महेश टोपले, देवा कासार, सुनील माळी, शहादा प्रखंड अध्यक्ष कैलास पाटील, डॉ. सोनी संजय पाटील, तळोदा येथील डॉ. पिंपरी, मुकेश जैन उपस्थित होते.
 
 
 
यावेळी राष्ट्रीय सेवक संघातर्फे कार सेवकांच्या देखील सत्कार करण्यात आला पवित्र जलाने भरलेल्या कलशाचे पूजन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या जयघोष केला. कलश नंदुरबार येथे रवाना करण्यात आला असून नंदुरबार येथून अयोध्येला कलश घेऊन रवाना होणार आहेत व ५ ऑगस्टला होणार्‍या भूमिपूजनाच्या वेळी हे पवित्र जल देशभरातून आलेल्या इतर कलशांसोबत टाकण्यात येईल अशी माहिती अजय शर्मा यांनी दिली.