कृती फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन कोरोना योद्धाचे समुदेशन

    दिनांक : 29-Jul-2020
Total Views |

Corona_1  H x W
 
 
जळगाव : कृती फाऊंडेशनच्यावतीने कोरोनाशी लढा देत असलेल्या योद्ध्यासाठी व्हिडिओ कॉन्फ्रसींगच्या माध्यमातून संवाद साधून कोरोना समज, गैरसमज व घ्यावयाची काळजी याबाबत फाऊडेशनच्या कार्याध्यक्षा डॉ.श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन यांनी योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करून सर्वांच्या प्रश्नांचे शंकांचे निरसन केले. आजच्या या मार्गदर्शनातून मानसिक बळ मिळाल्याचे सांगत यावेळी अनेकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले. कृती फाऊंडेशनचे सचिव जी.टी. महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. सध्या कोरोना महामारीच्या काळात कृती फाउंडेशनने राबविलेला उपक्रम प्रेरणादायी आहे.