‘मौसम’ अ‍ॅप सांगणार 450 शहरांतील हवामानाची स्थिती

    दिनांक : 29-Jul-2020
Total Views |
 
 
 
केंद्र सरकारने देशातील बदलते हवामान आणि त्याची माहिती लोकांपर्यंत सहजपणे पोहचविण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सहयोगाने ‘मौसम’ नामक मोबाइल अ‍ॅप भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी लाँच केले आहे. ‘मौसम’ हे अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

APP_1  H x W: 0 
 
सुमारे 200 शहरांचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा आदी माहिती ‘मौसम’ देईल. त्याचबरोबर सुमारे 450 शहरांच्या आगामी
त दिवसांच्या हवामानाबाबतचा अंदाजही ते वर्तविल. यातील माहिती दिवसातून आठ वेळेस अपडेट होईल. एखाद्या शहरातील गेल्या 24 तासांमधील आकडेवारीही यात दिसेल. यामध्ये युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारे फीचरही आहे.
 
 
‘मौसम’ अ‍ॅप इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टीट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. वेधशाळेच्या नेटवर्कमध्ये वाढ करण्यासाठी, नवीन संगणकीय संसाधने खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.