‘तारक मेहता’...मधील बबिताजी यंदा बिग बॉसमध्ये

    दिनांक : 29-Jul-2020
Total Views |
 
 
‘बिग बॉस’ या शोचा 14 वा सीझन लवकरच सुरु होणार असून त्यात यावर्षी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या मालिकेतील बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता यंदाच्या बिग बॉसमध्ये दिसणार आहे. आता यात कोणकोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याची चर्चा सुरु झालीय. आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक कलाकारांची नावे यंदाच्या बिग बॉसच्या सिझनमध्ये समोर आली आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘सब टीव्ही’वरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील मुनमुन दत्ता. ही मालिका गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. त्यामुळे बबिताजी आणि परिणामी मुनमुनची फॅन फॉलोईंग भन्नाट आहे. या चर्चांमुळे तिचे अनेक फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅसेज करीत तिला बॉग बॉसमध्ये जाण्याबाबत विचारणा करीत होते. आता या सर्व चर्चांवर मुनमूनने इंस्टाग्रामवरून उत्तर दिले आहे.
 
 
MUNMUN DATTA_1   
 
मुनमुन दत्ता हिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, बिग बॉस हा शो माझ्या आवडीचा आहे मात्र त्यात सहभागी होण्याचा माझा कोणताही मानस नाही, कृपया अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
 
 
दरम्यान, यंदाचा बिग बॉसचा सीझन कोरोनाच्या संकटातही पार पडणार आहे. त्यासाठी एक नवी कॉन्सेप्ट घेऊन शोचे निर्माते येतील. यामध्ये लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियमसुद्धा पाळले जातील.