दिल्लीत 1 ऑगस्टपासून ‘सिरो सर्व्हे’

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
 
नवी दिल्ली : दिल्लीच्या जनतेत कोरोनाची रोगप्रतिकारक क्षमता (हर्ड इम्युनिटी) विकसित झाली का, याची पाहणी करण्यासाठी दिल्लीत 1 ऑगस्टपासून सिरो सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आज सांगितले.
 
 
Satyendra_Jain_1 &nb
कोरोनाविरुद्धच्या रोगप्रतिकारक क्षमतेबाबत परस्परविरोधी दावे केले जात आहे. त्यामुळे कोरोनाची लागण दिल्लीच्या 40 टक्के जनतेला झाली का, हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे जैन यांनी सांगितले.
 
 
40 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, असे काही जणांचे म्हणणे आहे, तर 60 ते 70 टक्के लोकांना संसर्ग झाल्यानंतरच अशी रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, असे दुसर्‍या गटाचे म्हणणे आहे, त्यामुळे याबाबतचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी सिरो सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
 
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील नव्या बाधितांची संख्या कमी होत आहे. सोमवारी तर 627 नवे बाधित आढळले होते. काही दिवसापूर्वी एका दिवसात 4 हजारापर्यंत नव्या रुग्णांची संख्या गेली होती. गेल्या काही दिवसात ती हजारापर्यंत खाली आहे.