पबजी, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स ‘बॅन’च्या मार्गावर !

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
 
 
केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनला जबरदस्त झटका देत टेक कंपन्यांवर कारवाई केली आहे. सरकारनं चीनचे तब्बल 47 आणखी अ‍ॅप्स बॅन केले असून अद्याप त्यांची माहिती देण्यात आलेली नाही. मोदी सरकारने चीनवर केलेले हे दुसरे डिजिटल स्ट्राईक. आता बॅन करण्यात आलेले 47 अ‍ॅप्स हे गेल्या महिन्यात बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचे क्लोनिंग करीत होते. उदा. टिकटॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉक लाइट मात्र प्ले स्टोअरवर होते.
 
 
GAME_1  H x W:
 
 
याआधी चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यामध्ये शेअरईट, कॅमस्कॅनरसारखे प्रसिद्ध अ‍ॅप्स होते. एवढेच नाही तर सरकार आता आणखी 275 अ‍ॅप्स बॅन करण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये पब्जी, लूडो, अलिबाबासारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे.
 
 
सरकार सध्या या 275 अ‍ॅप्सवर नजर ठेवून असून हे अ‍ॅप्स नॅशनल सिक्यूरिटी किंवा युझरची माहिती तर लीक करीत नाही ना, याची तपासणी करीत आहेत. ज्या कंपन्याचे सर्व्हर चीनमध्ये आहे, अशा कंपन्यांचे अ‍ॅप्स प्रामुख्याने बॅन केले जाणार आहे, हे मात्र नक्की.
हे प्रसिद्ध अ‍ॅप्स होऊ शकतात बॅन
 
 
सरकारनं तयार केलेल्या यादीमध्ये काही प्रमुख गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. यातपबजी मोबाईल, लूडो वर्ल्ड यांचा समावेश आहे. तसेच, रिव्ह्यू केले जात असलेल्या लिस्टमध्ये शिओमीने तयार केलेले झिली, इ-कॉमर्स अलिबाबा अलिएक्सप्रेस, रेसो आणि बायटेडन्सचे अनलाईक अ‍ॅपचा समावेश आहे.
 
 
चिनी अ‍ॅप करत होते गैरवापर
 
 
चायना अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीन अँन्ड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर काही अ‍ॅप्सचा गैरवापर करीत आहे. हे अ‍ॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापर कर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते. याव्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालय यांनाही अशा धोकादायक अ‍ॅप्सवर तातडीनं बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अ‍ॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.