शिरपूरला कत्तलीसाठी जाणारी ५१ गुरे पकडली

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |

shirpur_1  H x
शिरपूर पोलिंसांची कारवाई, निर्दयीपणे पाय बांधून
कोंबल्याने १५ गुरांचा मृत्यू, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
शिरपूर : येथे शिरपूर तालुक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान कत्तलीसाठी जाणारी ५१ गुरे पाय बांधून वाहतूक करतांना पकडण्यात आली. त्यामुळे शिरपूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे. गोवंश तस्करीप्रकणी पोलिसांनी २७ रोजी रात्री तीन ते पाच वाजे दरम्यान कारवाई केली आहे.
 
पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हात ऑलआउट व कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. या मोहिमेत शिरपुर तालुका पो.स्टे.चे सपोनि/अभिषेक पाटील व त्यांचे पथक हे कार्यवाही करीत असतांना गुप्त माहितीच्या आधारे गुरे तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पळासनेर येथे महामार्ग क्र.तीनवर नाकाबंदी लावुन वाहनांची तपासणी सुरु केली. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास एक ट्रक नाकाबंदीच्या ठिकाणापासून सुमारे २०० मीटर अलीकडे थांबून त्यामधून चालक उतरुन अंधाराचा फायदा घेत पळून जातांना दिसून आल. त्यामुळे नाकाबंदीवरील पोलीसांना शंका आल्याने त्यांनी वाहनाचे जवळ जाऊन वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये माल भरण्याच्या ठिकाणी खाली तसेच वर असे दोन कप्प्यांमध्ये पाय बांधून ठेवलेली गुरे दिसून आली.
त्यामुळे दोन पंचासमक्ष संपुर्ण वाहन तपासले असता त्यामध्ये ५१ गुरे मिळून आली. त्यापैकी १५ गुरे ही मयत स्थितीत आढळुन आली. या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सुमारे १०,२० हजार रुपये किंमतीची एकूण ५१ गुरे प्रत्येकी २० हजार रुपये, १५.००,००० रुपये किंमतीचे कंटेनर ट्रक क्रमांक आर.जे.०९ जी.सी.२८६१ २५ लाख २० हजार किंमतीचा माल हस्तगत केला आहे. त्याअनुषंगाने पोना.संजीव जाधव यांचे फिर्यादीवरुन शिरपुर तालुका पो.स्टे.ला, भारतीय प्राण्यांना निदर्यतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा महाराष्ट्र ऍनीमल प्रिझव्हेशन ऍक्ट प्रमाणे वरील वाहनाचे चालक / मालक यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स.ई. नरेंद्र खैरनार हे करीत आहेत. जप्त गुरे ही भुयारेश्वर गोशाळा मांजरोद ता.शिरपुर येथे जमा करण्यात आले आहे. मयत गुरांना जमीनीत पुरण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पो.स्टे.चेस.पो.नि.अभिषेक पाटील, पोसई दिपक वारे, पो.हे.कॉ. देवीदास पवार, कैलास पाटील, संजय देवरे, पोना, संजीव जाधव, संजय धनगर, रविंद्र मोरणीस, पो.कॉ. संदीप शिंदे ,सिध्दांत मोरे, चालक पो.कॉ.गोविंद कोळी यांनी केलेली आहे.