अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनासाठी प्रकाशा येथील जल अन् माती रवाना

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |

shirpur_1  H x  
 
मामाचे मोहिदे, २७ जुलै
प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांचे आयोध्या येथे भव्य मंदिराचे भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी होत आहे. या भूमिपूजनासाठी प्रकाशा दक्षिण काशी येथील त्रिवेणी संगमातून जल, माती व रेती यांचे पूजन करून २७ जुलै रोजी अयोध्या येथे पाठविण्यात आले.
 
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष धीरूभाई पाटील, जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संजय पुरानिक, सहमंत्री अजय कासार, सहकार्यवाह खुशाल पटेल, जिल्हा सेवा प्रमुख धनंजय बारगड, जिल्हा गोरक्षा प्रमुख राजा साळी, जिल्हा मठ मंदिर प्रमुख आर.आर.मगरे, जिल्हा सह सत्संग प्रमुख ह.ब.प महेश टोपले, देवा कासार, सुनील माळी, शहादा प्रखंड अध्यक्ष कैलास पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कार सेवकांच्या सत्कार करण्यात आला. संजय पाटील (नंदुरबार), अजय शर्मा (शहादा), डॉ.सोनी (शहादा, तळोदा), प्रखंड कोषाध्यक्ष डॉ.शांतीलाल पिंपरी तळोदा, शहर अध्यक्ष मुकेश जैन यांचीसुद्धा उपस्थिती होती.