भाविकांनी लांबूनच घेतले शिवदर्शन, मंदिर परिसरात शुकशुकाट

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर श्रावण सोमवारी शिवमंदिरे बंद

shiv_1  H x W:
 
जळगाव, 27 जुलै
श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी शहरातील सर्व मंदिर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी बंद होती. त्यामुळे भाविकांनी मंदिराबाहेरुच महादेवाचे दर्शन घेतले.
 
दरवर्षी श्रावण महिन्यातील सोमवारी शहरातील शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. तसेच मंदिर रंगरगोटी, रोषणाई करण्यात येते. परंतु, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील तसेच परिसरातील सर्वच शिवमंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले. दरम्यान, मंदिरात नियमीत पूजा सुरु असते.
 

shivd_1  H x W:
 
 
कोरोनामुळे शहरातील ओंकारेश्वर मंदिर, शिवधाम मंदिर, मेहरूणमधील पंचमुखी महादेव मंदिर, उमाळ्यातील उमा-महेश्वर मंदिर व लहान-मोठे महादेव मंदिरे श्रावण सोमवारी बंद असल्याने भक्तांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले. तसेच मंदिर बंद आणि कोरोनाच्या भितीमुळे मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला.
 
जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील उमाळे या गावातील उमामहेश्वराचे शिवमंदीर आहे. श्रावण सोमवार निमित्त आज २७ जुलै रोजी या शिवमंदिरात उमा-महेश्वराचे दर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी बंद दारातून दर्शन घेतले. जळगावपासून उमाळे हे गाव १४ किमी अंतरावर आहे. उमा-महेश्वराचे शिवमंदीर जागृत स्थान असून खान्देश वासियांचे श्रध्दास्थान आहे. हे देवस्थान महामार्गापासून अर्धा किमी अंतरावर आहे.