जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर

    दिनांक : 27-Jul-2020
Total Views |
दिवसभरात २१४ रूग्ण कोरोनामुक्त, नवे आढळले ३१२


coror_1  H x W: 
 
जळगाव, २७ जुलै
जिल्ह्यात सोमवारी ३१२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजाराच्या पार झाला आहे. दिवसभरात २१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
 
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग तसाच कायम असून सोमवारी जिल्ह्यात ३१२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. तर दुसरीकडे दिवसभरात २१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 
नवीन आढळलेले रुग्ण
जामनेरमध्ये ६३, चाळीसगाव ४३, जळगाव शहर ४१, चोपडा २७, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ १०, अमळनेर २५, पाचोरा ८, भडगाव ११, धरणगाव १४, यावल १०, एरंडोल ३, रावेर १३, पारोळा १७, मुक्ताईनगर १३, बोदवड १, इतर जिल्हे ३ असे एकूण ३१२ रूग्ण नव्याने आढळून आले आहे.
 
एकूण तालुकानिहाय रूग्णसंख्या
जळगाव शहर- २५७१, जळगाव ग्रामीण-४५८, भुसावळ-८३०, अमळनरे-६५८, चोपडा-६९८, पाचोरा-३१६, भडगाव-३९५, धरणगाव-४४०, यावल-४२६, एरंडोल-४७१, जामनेर-६८७, रावेर-६५३, पारोळा-४५१, चाळीसगाव-४११, मुक्ताईनगर-३१८, बोदवड-२२४, इतर जिल्हे-३७ असे एकूण १० हजार ४४ रूग्ण आढळले आहे.
 
दिवसभरात दोघांचा मृत्यू
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार ७० रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ४६९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी उपचारादरम्यान जळगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी कळविले आहे.