तीन सदस्यीय केंद्रीय समिती प्रशासनाच्या कामाबद्दल समाधानी

    दिनांक : 26-Jul-2020
Total Views |
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती, समितीकडून जिल्हा प्रशासनास महत्त्वाच्या सूचना
  
dio_1  H x W: 0
 
जळगाव, २६ जुलै
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन सदस्यीय केंद्रीय समितीद्वारे रविवारी पाहणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनास समितीकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या असून प्रशासनाच्या आणि कोविड रुग्णालयाच्या कामकाजबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
केंद्रीय समितीमध्ये केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार, डॉ. अरविंद कुशवाह, डॉ. बॅनर्जी यांचा समावेश होता. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या समितीकडून शहरातील काही प्रतिबंधित क्षेत्रात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात भेट देत पाहणी केली. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
समितीद्वारे प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना कक्षाची पाहणी
या पथकाद्वारे एमआयडीसी परिसरातील कौतिक नगर आणि शिवाजीनगर येथील प्रतिबंधित क्षेत्रास भेट दिली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, इन्सीडेंट अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामांनद आदी उपस्थित होते. प्रतिबंधित क्षेत्रास भेट दिल्यानंतर पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कोरोना कक्षाची पाहणी करून अधिकार्‍यांना विविध सूचना केल्यात. त्यानंतर केंद्रीय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत सूचना दिल्या.
 
 
केंटमेंट झोनमधील प्रत्येकाचा कोरोना टेस्ट व्हावी
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, केंद्रीय समितीने पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्यात नमुने संकलन अधिकाधिक कसे वाढतील, लोकांमधील कोरोनाचे भय कसे कमी होतील, जनतेशी संवाद वाढवावा या तीन मुद्यांसह पूल टेस्टिंगचा (ज्यात एकावेळी अनेकांचे नमुने तपासले जातात) ज्या ठिकाणी संसर्गाचा धोका कमी आहे तेथे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनतेने मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे आणि वेळोवेळी हात धुणे या तीन गोष्टी पाळाव्यात, अशीही समितीकडून सांगण्यात आले. तसेच जिल्ह्यातील कंटमेंट झोनमधील प्रत्येकांची नोंद प्रशासनाने ठेवावी. यासह केंटमेंट झोनमधील प्रत्येक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात यावी, अशीही सूचना समितीकडून देण्यात आल्या.
 
कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये ३० बेड अंसिटंट
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्स आणि डॉक्टरांची कमतरतेचा मुद्दा जिल्हाधिकार्‍यांनी केंद्रीय समितीकडे मांडला. तसेच कोरोना टेंस्टिंग प्रयोगशाळेच्या बळीकटीकरणासाठी कंेंद्राने सहाय्यता करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांनी समितीकडे केली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईक बेड अंसिटंट पदासाठी इच्छूक असल्यास त्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी नागरिकांना केले. सध्या कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये ३० बेड अंसिटंट आहे.
 
अफवानावर विश्‍वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी
केंद्र सरकारकडून कोरोनाबाधित प्रत्येक रुग्णामागे खर्च म्हणून पैसे दिले जातात, अशा संदेश सोशल मिडीयाद्वारे व्हायरल होत आहे. यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, ही निव्वळ अफवा असून याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच रुग्ण संख्या वाढल्यास त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवरच वाढतो. त्यामुळे अशा कुठल्याही अफवेश बळी न पडता कोरोनाची कुठलेही लक्षणे आढळल्यास कोरोनाची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.
 
कोरोनाचा मृत्यूदर जिल्ह्यात सध्या ५ टक्क्यावर आला आहे. तो दर अजून कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरु आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत शेवटी म्हणाले.
 
पत्रपरिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, इनसिडन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.