खडकीच्या विवाहीतेचा संशयास्पद मृत्यू

    दिनांक : 25-Jul-2020
Total Views |
 
jamner_1  H x W
 
 
माहेरकडील मंडळीनी केली इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
जामनेर : तालुक्यातील खडकी येथील विवाहीतेच्या संशयास्पद मृत्युमुळे डोहरी (ता.जामनेर) येथील माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर ठपका ठेवत मृत्यू पावलेल्या विवाहीतेच्या इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारामधे दांगडो केला.
 
 
अंजना तानाजी नाईक वय ३० असे मयत झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. या घटनेबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयत विवाहीतेचा मृत्यू झाल्यानंतर तीच्या अंतीम संस्काराची तयारी सासरच्यांनी परस्पर उरकून घेण्याचे ठरविले. गावातील काहींनी ही घटना माहेरच्यांना कळविली. त्यामुळे माहेरहून नातेवाईक मंडळी थेट उपजिल्हा रूग्णालयात पोहचले तेथे वाद होऊन माहेरच्यांनी सासरच्या मंडळींना चांगलेच चोपले. मुलीला मारून टाकल्याचा आरोप मोहरवासियांनी केला.
 
तसेच तिच्या अंगावर मारहाणीच्याही खुणा असल्याचे सांगीतले. याप्रकाराने वाद आणखीनच वाढला. अखेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी व सहकार्यांनी माहेरच्या मंडळींची समजूत घालून,त्यांनी केलेली इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी मान्य केली. त्यामुळे मयत विवाहीतेचा मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला.
 
या घटनेबाबत दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विवाहितेच्या माहेरवासियांनी केली. शवविच्छेदानाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले. मयत महिलेच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा व पती असा परिवार आहे.