युरीयासाठी जिल्ह्यात शेतकर्‍यांची दमछाक

    दिनांक : 25-Jul-2020
Total Views |

patil_1  H x W:
 
 
खताचा काळाबाजार : युरीयावर डल्ला मारला कुणी?  मुख्य विक्रेत्यांकडून युरीया
कृषी केंद्रांना पोहचलाच नाही, जि.प.शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांचा उपोषणाचा इशारा
जळगाव : जिल्ह्यात रासायनिक खताचा तुटवडा कमी होण्यास तयार नाही. मोजक्या काही कृषी केंद्रांनाच युरीया मुख्य डिलरकडून पुरवठा करण्यात आला. मात्र या कृषी केंद्रांवर शेतकर्‍यांच्या रांगा लागल्या आहेत. आजही जिल्ह्यात युरीया खताची ऐन हंगामात टंचाई झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. याबाबत जि.प.चे आरोग्य, शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना शेतकर्‍यांना युरीया व इतर खते उपलब्ध करून देण्याबाबत१६ जुलै रोजी पत्र दिले होते. परंतू शेतकर्‍यांना आवश्यक त्या प्रमाणात खते उपलब्ध झाली नाहीत. मात्र जि.प.चे आरोग्य, शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांना जि.प.कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी जिल्ह्यातील खताची व्यवस्था सुरळीत झाल्याचे दिशाभूल करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे युरीया खतप्रश्‍नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सभापती पाटील यांनी दिला आहे.
 
जिल्ह्यात शेतकर्‍यांना रासायनिक खते मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांना तात्काळ सक्तीच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी पत्राद्वारे सभापती पाटील यांना कळविले आहे. त्यामुळे जि.प.च्या आरोग्य शिक्षण सभापतींसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पत्रामुळे दिलाभूल झाली आहे.
मुख्य विक्रेत्याकडूप युरीया गडप?
खरीप हंमागासाठी शेतकर्‍यांना पीकांन वेळेत युरीया देण्याची गरज आहे. कारण ही युरीया देण्याची शेतकर्‍यांची वेळ उपलब्धतेअभावी निघून जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनावर यांचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात आवश्यक तेवढी खते उपलब्ध आहे तर खताचा साठा कोण गायब करतोय त्यावर कृषी विभागातील अधिकार्‍यांचे नियंत्रण नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. युरीया मुख्य विके्रत्यांकडून कृषी केंद्रांना न देता परस्पर गायब करीत त्यांचा काळाबाजार करीत असल्याचे समोर आले आहे. कृषी विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. कृषी विभागाने साठेबाजावर कारवाई न करता झोपेचे सोंग घेत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.