सोमवारपासून ‘नो व्हेईकल झोन’ रद्द

    दिनांक : 25-Jul-2020
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश, वाहतूकधारकांना दिलासा
 
 
sdf_1  H x W: 0
जळगाव, २५ जुलै
जळगाव मनपा हद्दीतील तसेच अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रातील ‘नो व्हेईकल झोन’चा आदेश सोमवार, २७ जुलैपासून जिल्हाधिकार्‍यांनी आज रद्द केला. या निर्णयामुळे सोमवारपासून रस्ते खुले होणार असल्यामुळे वाहतूकधारकांना दिलासा मिळणार आहे.
 
 
जिल्ह्यात आणि जळगाव शहरातही वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाने दुसर्‍यांदा केलेले लॉकडाऊन संपल्यानंतर आता बाजारातील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रमुख मार्केट भागात ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करून काही वाहनांना बंदी घातली आहे. मात्र, शहरात बाजारपेठेत वाहने लावण्यासाठी पुरेशी पार्किंग व्यवस्थाच नसल्याने हा निर्णयामुळे वाहतूकाधारकांची त्रास सहन करावा लागता होता. शहरात वाहनांची संख्या प्रचंड असल्याने त्यातच ‘नो व्हेईकल झोन’मुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांच्या नाकी नऊ आले होते.
 
 
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी १३ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार, मनपा हद्दीतील फुले मार्केट, गांधी मार्केट, गोलाणी मार्केट, सुभाष चौक, बळीराम पेठ आणि दाणा बाजार या गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही वाहनास मार्केटमध्ये प्रवेशबंदी होती. त्यामुळे पत्रे लावण्यात आलेल्या ठिकाणी वाहन उभी करण्यात येत होती. तसेच एका बाजूनेच बाजारपेठेत प्रवेश मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी व्हायची. याबाबत महापौर भारती सोनवणे तसेच इतर संस्थांनी प्रशासनाची चर्चा करुन पत्रे काढण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने चित्रा चौक ते टॉवर चौकातील मार्ग खुला करण्यात आला होता.
 
 
दरम्यान, ‘नो व्हेईकल झोन’मुळे फारसा काही उपयोग होत नसून दररोज वाहतूक कोंडीच्या घटना घडत असतात. तसेच याचा नाहक त्रास वाहतूकधारकांना होत असे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी २५ रोजी याबाबत आदेश काढला असून सोमवार, २७ जुलैपासून ‘नो व्हेईकल झोन’ हा आदेश रद्द करण्यात आला आहे.