छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चाळीसगावच्या ‘त्या’ नगरसेवकाची ‘नाकघासणी’

    दिनांक : 24-Jul-2020
Total Views |
 
maharaj_1  H x
 
जळगाव, २४ जुलै
चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी शिवप्रेमींच्या मागणीवरून शुक्रवारी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हात जोडून नाकघासणी करून माफी मागितली.
 
 
भांडण, मारहाण तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चाळीसगाव शहरातील नगरसेवक राजेंद्र चौधरी व त्याचे ५ कुटुंबीय यांच्याविरुद्ध ६ मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यासंदर्भात न्यायालयीन कामकाज शुक्रवारी जिल्हा न्यायालयात होते. फिर्यादी आणि संशयित नगरसेवक चौधरी हे जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुपारी उपस्थित झाले. त्यावेळी शिवप्रेमींनी त्यांना घेराव घालत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, पोलीस पथकाच्या उपस्थितीत नगरसेवक चौधरी यांनी पुतळ्यासमोर माफी मागितली.