कोरोना कहर : जिल्ह्यात आढळले ३३४ कोरोनाबाधित

    दिनांक : 24-Jul-2020
Total Views |
  • कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजारांहून अधिक
  • जळगाव शहरात सर्वाधिक 90 पॉझिटिव्ह, १० जणांचा मृत्यू
  • दिलासादाखक : २०० जण कोरोनामुक्त
Corona _1  H x  
 
जळगाव : जिल्ह्यात आणि शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढ होत असून शुक्रवारी ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यात सर्वाधिक 90 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरातील असून दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादाखक बाब म्हणजे शुक्रवारीसुद्धा २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यात जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९०, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर १९, चोपडा ७, पाचोरा ४०, भडगाव १४, धरणगाव ३२, यावल १, एरंडोल ९, जामनेर ३२, रावेर ७, पारोळा २, चाळीसगाव ४०, मुक्ताईनगर ७ तर इतर जिल्ह्यातील १ जणांचा समावेश आहे.
 
१० जणांचा मृत्यू
कोरोनामुळे दिवसभरात १० बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील १, अमळनेर, जळगाव, भुसावळ, रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ तर यावल तालुक्यातील दोन तर पाचोरा तालुक्यातील तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
 
कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजारांहून अधिक
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना संख्या ९ हजार १८३ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ८३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत तब्बल ४५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सध्या २ हजार ८९९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.
 
पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याला कोरोनाची लागण
शहरात एकूण ९० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात शहरातील शिवाजीनगर परिसरातील पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना लागन झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्यांना देखील याची बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यांचा शोध घेणे आता प्रशासनासमोर चांगलेच आव्हाण आहे. कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने पेट्रोलपंप सील करुन, त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.