फैजपूर प्रांतची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचा आशावाद
 
 
फैजपूर, ता.यावल : फैजपूर उपविभागात असलेल्या रावेर व यावल तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. या दोन्ही तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता केवळ २५ टक्के रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. भविष्यातही नागरिकांनी काळजी घेत नियमांचे पालन केल्यास फैजपूर उपविभाग लवकरच कोरोनामुक्त होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
 
 
Faizpur_Ajit_Thorbole_1&n
 
सद्य:स्थितीत यावल तालुक्यातील केवळ ३५ बाधित रुग्ण, तर रावेर तालुक्यातील १३५ बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसेच संशयित म्हणून यावल तालुक्यातील ७२ असे एकूण ९५ रुग्ण उपचार घेत असून केवळ २५ टक्के रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत त्या रुग्ण होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे.
 
 
जळगाव येथे यावल तालुक्यात ७० रुग्ण उपचार घेत असलेले २३, तर रावेर तालुक्यातील कोरोना तसेच संशयित म्हणून यावल तालुक्यातील २३, तर रावेर तालुक्यातील ७२ असे ९५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील केवळ २५ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. ७५ टक्के रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये यावल तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के तर रावेर तालुक्याचे ७० टक्के आहे. तसेच जळगाव येथे यावल तालुक्यातील सात, तर रावेर येथील ६३ असेच ७० रुग्ण उपचार घेत असल्याचेही डॉ.थोरबोले यांनी सांगितले.
 
 
मंगळवारपर्यंतची माहिती देताना डॉ. थोरबोले यांनी सांगितले की, दोन्ही तालुक्यातील आतापर्यंत एकूण ३४७० जणांनी स्वब दिले. त्यात यावल तालुक्यातील १७१०, तर रावेर तालुक्यातील १७६० जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेले यावल येथील ३६८, तर रावेर येथील ५६२ जणांचा असा एकूण ९२९ जणांचा समावेश आहे. तसेच निगेटिव्ह म्हणून कोरोना समावेश आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेले यावल येथील ३६७ तर रावेर येथील ५६२ जणांचा असा एकूण ९२९ जणांचा समावेश आहे. तसेच निगेटिव्ह म्हणून यावल तालुक्यातील १३४३, तर रावेर तालुक्यातील ११९८ अशा एकूण २५४१ जणांचा समावेश आहे.
 
 
आजपावेतो एकही स्वॅब प्रलंबित नाही, तर तर दोन्ही तालुक्यातील कोरानाने मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ आहे. त्यामध्ये यावल तालुक्यातील २६, तर रावेर तालुक्यातील ३८ जणांचा समावेश आहे. हा मृत्युदर ६.९ टक्के इतका आहे. फैजपूरच्या आता केवळ ४ रूग्णांवर उपचार सुरू फैजपूर शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात आतापर्यंत एकूण ७० बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे त्यामुळे आता केवळ ४ रुग्ण कोरोना यावल तालुक्यातील २६, तर रावेर तालुक्याताल ३८ जणांचा समावेश आहे. हा मृत्यूदर ६.९ टक्के इतका आहे.
 
 
फैजपूरच्या आता केवळ ४ रूग्णांवर उपचार सुरू फैजपूर शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात आतापर्यंत एकूण ७० बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५ रुग्ण मयत झाले आहेत. त्यामुळे आता केवळ ४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.