संतोष पाटील यांचा एका तासात सर्वांत जास्त प्लेज घेण्याचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
पाचोरा : तालुक्यातील गोराडखेडा येथील शिक्षक तथा व्याख्याते संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी सर्वात जास्त प्लेज एका तासात घेण्याचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड नोंदविला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्लेज घेतल्या. याच बरोबर त्यांनी कोरोना योध्याचे ई-सर्टिफिकेट एका तासात सर्वांत जास्त मिळविले. यात त्यांनी कोरोना प्लेज राष्ट्रीय एकता प्लेज अशा विभिन्न प्रकारच्या प्लेज घेतल्या. त्यांनी चोवीस प्लेज सर्टिफिकेट व वीस कोरोना योद्धा सर्टिफिकेट मिळविले. हा रेकॉर्ड त्यांनी एका तासात आपल्या नावे केला. लॉकडाउन काळाच्या काळातील सदुपयोग त्यांनी केला.
 

Pachora_Santosh Patil_1&n 
 
त्यांनी याआधी ओएमजीचा राष्ट्रीय रेकॉर्ड नावे केलेला आहे. ते सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक आहेत. ते व्याख्यानाचे मिळालेले मानधन विभिन्न अनाथालयास व वृद्धाश्रमास देतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड करून त्यांनी अजून एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.