जारगाव चौफुलीवर ट्रॅफिकजाममुळे लांब रांगा

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
  • कृष्णापुरी फरशी व जारगाव चौफुली जवळील नाल्याची उंची वाढणार कधी?
  • लोकप्रतिनिधींबाबत नागरिकांचा नाराजीचा सूर
  
पाचोरा : तालुक्यासह  सोयगाव तालुक्यातील बनोटी वरच्या भागात काल रात्री जोरदार पाऊस झाल्याने हिवरा नदीला मोठया प्रमाणावर पूर आल्याने पाचोरा शहरातील कृष्णापुरी फरशीवर पाणी आल्याने या मार्गावर वाहतुक ठप्प झाली व जारगाव चौफुलीवर शहरातील व शहराबाहेरील तसेच मुंबई-नागपूर हायवे मार्गावरील चारही बाजूंनी ट्रॅफिक वाढल्याने ट्रॅफिकजामच्या मोठया प्रमाणावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात अशोका बिल्डकॉमद्वारा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनधारकांना तासन्तास ट्रॅफिकजामचा सामना करावा लागला.
 

Pachora_Traffic Jam_1&nbs 
 
हिवरा नदीवरील खडकदेवळा येथील धरण यावर्षी लवकर भरल्याने वरच्या भागात पाऊस पडला की नदीला पूर येत असल्याने व कृष्णापुरी फरशिवर पाणी आल्याने बर्‍याच भागाचा संपर्क तुटत आहे. वाहतुकीसाठी एकमेव मार्ग म्हणजे जारगाव चौफुली व या चौफुलीवरील नाल्यास पूर आल्यास वाहतूक पूर्णतः ठप्प होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णापुरी फरशीची व जारगाव चौफुलीजवळील नाल्याची उंची वाढवण्याची मागणी होत आहे. परंतु लोकप्रतिनिधी याकडे सोयीस्कररित्या दूर्लक्ष करतानाचे चित्र दिसून येत आहे शहरातील रस्ते व विविध कॉलोनी भागात भुयारी गटारींचे कामे केली जात आहेत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णापुरी फरशी व जारगाव चौफुली जवळील नाल्याची उंची वाढत नाही आहे नेमकं याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे.