कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांचा चोपडा येथे दौरा

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
चोपड्यात बाजारपेठ सक्तीने बंद; शिस्तीचा निव्वळ देखावा 
 
 
चोपडा : तालुक्यात कोरोनाचा प्रसार हा वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. चोपड्यातील बाधितांची संख्या ५६७ झाली असूनही भरपूर अहवाल प्रतीक्षेत आहेत.त्याच पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी चोपडा येथे दौरा केला. त्यांना शहरात दुपारी दोननंतर कसे कडकडीत बंद असते याचा तसेच शिस्त पाळली जात असल्याचा देखावा करण्यात आला.
 
 
Chopda_Collector Visit_1&
 
यावेळी पालिका सभागृहात पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी सांगितले कि, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढलेला असून कुणालाही कोरोनासदृश लक्षणे असल्यास त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येऊन तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन त्यावर त्वरित उपचार केले जाईल. त्यामुळे कोरोनाचा प्रसारही होणार नाही. सोशल मीडियावर कोरोनाविषयी काही अफवा सुरु आहेत. त्यावर विश्वास ठेऊ नये. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, पोलीस उपअधिक्षक सौरव अग्रवाल, तहसीलदार अनिल गावित व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांची उपस्थिती होते.
 
 
 दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटरची पाहणी केली. तिथे त्यांनी अधीक्षक डॉ.मनोज पाटील व डॉ.पंकज पाटील यांच्याकडून तेथील परिस्थिती जाणून घेतली. याठिकाणी सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व स्थानिक बाजारपेठेतही नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशा सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केली.
 
 
तसेच तालुक्यातील जनतेने विनाकारण बाहेर फिरु नये व शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रांत सीमा अहिरे, पोलीस उपअधीक्षक सौरव अग्रवाल, तहसीलदार अनिल गावित, न.पा.मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.लासुरकर व शहर पो.स्टे.प्रभारी पोलीस उपनिरिक्षक मनोज पवार व ग्रामीण पो.स्टे. प्रभारी पोलीस उपनिरिक्षक संदिप आराक यांची उपस्थिती होती.
 
 
जिल्हाधिकारी येण्याच्या अर्धा तासाअगोदर न.पा. प्रशासनाने शहरातील संपूर्ण दुकाने कुठलीही पूर्वसुचना न देता बंद करायला लावली. जेणेकरुन जिल्हाधिकार्‍यांना देखावा म्हणून शहरात कडक लॉकडाऊन पाळला जातोय. परंतु यामुळे सर्वसामान्य धंदेवाले व फेरीवाल्यांचे नुकसान झाले. व्यापार्‍यांमध्ये त्यामुळे नाराजीचा सूर होता.