पहूर येथे कोरोना योध्यांना कोविड प्रतिबंधात्मक किट वाटप

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
 
पहूर, ता.जामनेर : पहूर पेठ व पहूर कसबे या दोन्ही गावातील अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पत्रकार या सर्व कोविड योध्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा यांच्याद्वारे कोविड नियंत्रण किटचे वाटप करण्यात आले.
 
 
Pahur_KIt_1  H
 
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स नेहमी घरोघरी जाऊन सर्व्हे करीत आहेत. ग्रामपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार कोविड रूग्णांना सेवा देत आहेत. गाव निर्जंतुकीसाठी मेहनत घेत आहे. तसेच पत्रकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून कार्य करीत आहेत. या सर्व कोरोना योध्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा यांच्याकडून सॅनिटायझर, मास्क तसेच हात धुण्यासाठी साबण या किटचे वाटप करण्यात आले.
 
 
 
यावेळी राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष शैलेश पाटील, माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, किरण पाटील, आशिष माळी, रवी मोरे, राजू पाटील, शंकर जाधव, महेंद्र बनकर यांचेसह अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, सफाई कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.