कोरोना कहर : जिल्ह्यात आढळले ४१८ कोरोनाबाधित

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
जळगाव शहरात सर्वाधिक १२१ पॉझिटिव्ह, १२ जणांचा मृत्यू

Corona_1  H x W 
 
जळगाव, २२ जुलै
जिल्ह्यात आणि शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढ होत असून बुधवारी ४१८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. सर्वाधिक १२१ कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरातील असून दिवसभरात १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादाखक बाब म्हणजे बुधवारीसुद्धा २१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यात जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर १२१, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ २९, अमळनेर १५, चोपडा ४५, पाचोरा १८, भडगाव २, धरणगाव २५, यावल १६, एरंडोल १०, जामनेर ३८, रावेर ३३, पारोळा ५, चाळीसगाव ४४, मुक्ताईनगर २, बोदवड ३ अशी रूग्ण संख्या आहे.
 
१२ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे दिवसभरात १२ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील ३, अमळनेर तालुक्यात २, जळगाव तालुका, यावल, रावेर, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येक याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
अशी आहे स्थिती
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना संख्या ८ हजार ६०५ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ४७० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत तब्बल ४२७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.