म.फुले यांच्या स्मारकाची तोडफोड करणार्‍याला शिक्षा करण्याची म.फुले ब्रिगेडची मागणी

    दिनांक : 21-Jul-2020
Total Views |
 
 

Bodwad_Nivedan_1 &nb 
 
बोदवड : यवतमाळ येथील आझाद मैदानावर असलेल्या शिक्षण महर्षी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाची अज्ञात माथेफिरूने विटंबना केली. सोबत मागील काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहावर तोडफोड झाली. ज्या ज्ञानगंगेने आम्हा सर्वांना ज्ञान प्राप्त केले अशा थोर विचारवंतच्या स्मारकाची आणि राजगृहाची विटंबना झाली. अशा अज्ञात माथेफिरूविरुद्ध त्वरीत गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी विनंती बोदवड तालुका महात्मा फुले बिग्रेडच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर महात्मा फुले बिग्रेडचे तालुका अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण माळी, तालुका प्रसिध्दी प्रमुख संजय माळी, शहराध्यक्ष पवन माळी, उपाध्यक्ष निलेश माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.