पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेशी अतिप्रसंग

    दिनांक : 21-Jul-2020
Total Views |
 
दहिवद येथील घटना, एकावर गुन्हा दाखल
 
 
अमळनेर : पतीला जीवे मारणची धमकी देत विवाहित तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना तालुक्यातील दहीवद येथे ते चार महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Crime_1  H x W:
 
 
सुमारे चार महिन्यांपूर्वी दहीवद येथील एक वीस वर्षीय विवाहित तरुणीचा पती बकर्‍या चारायला आणि सासू सासरे नणंद शेतात गेले असताना शेजारील चंद्रकांत रमेश पाटील यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात घुसून तिचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना कुणाला सांगितली तर पती बकर्‍या चारायला जंगलात गेल्यावर विहिरीत फेकून देईल अशी धमकी दिल्याने महिलेने ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. तसेच तो वारंवार इशारे करून धमकी द्यायचा दरम्यान १९ रोजी दुपारी १२ वा. चंद्रकांत मोठा भाऊ अविनाश याने महिलेच्या सासूला दारू पिऊन शिवीगाळ करून भांडण केले. त्यावेळेस महिलेने तिच्यावरील अत्याचाराची घटना घरातील लोकांना सांगितली. त्यानंतर २० रोजी नातेवाईकांना घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत रमेश पाटील याच्याविरुद्ध बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहे