एरंडोल, पारोळा न.पा. क्षेत्रात विकासकामांसाठी ८ कोटी मंजूर

    दिनांक : 21-Jul-2020
Total Views |
 
 
आ.चिमणराव पाटील यांचे विशेष प्रयत्न
 
 
Chimanrao Patil_1 &n
पारोळा : एरंडोल व पारोळा नगरपालिका क्षेत्रात मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या दोन्ही नगरपालिका साठी विशेष प्रयत्न करून.विकासाची गंगोत्री आणून नगरपालिका क्षेत्रातील दुर्लक्षित कामांना प्राधान्य देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आ.पाटील यांच्याकडून होत आहे.शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येकी रु.४ कोटी याप्रमाणें दोन्ही नगरपालिकाना रु.८ कोटी मंजूर करून मतदारसंघात आपल्या कामाची छाप पाडून विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. यानंतर आणखी शहरातील प्रलंबित आवश्यक कामे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले.