पहूरपेठ येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍याला कोरोनाची बाधा; २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    दिनांक : 21-Jul-2020
Total Views |
 
 
पहूर : पहूरपेठ येथील संतोषीमाता नगरात राहणार्‍या ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली .दोन दिवसांपासून त्रास जाणवत असल्याने त्यांना पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पाझिटिव्ह आल्याची माहिती आहे. मगळवारी दिवसभरात पहूर कोविड सेंटरमधील एकुण ९९ रूग्णांची रॅपिड ऍॅन्टीजेन टेस्टिंग करण्यात आली. त्यात २७ जणांचा अहवाल कोरोना पाझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे.
 
 

Corona_1  H x W 
 
पहूरपेठ येथील ५, शेंदूर्णी ३, पाळधी ८, वाकोद ९ लोहारा १ तर जांभूळ येथील १ एका जणाचा समावेश आहे. पहूरपेठ संतोषीमाता नगरात राहत असलेल्या रूग्णाच्या परिसरातील संपूर्ण भाग फवारणी करून निर्जंतूक करण्यात आला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पहूरपेठ ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.