नंदुरबार, शहादा येथे १८७ वृक्षांची लागवड, संवर्धन

    दिनांक : 20-Jul-2020
Total Views |
 
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अभियान
 
 
नंदुरबार : महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मणार्थ येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात ७७ तसेच शहादा येथील शाळेच्या परिसरात ११० अशा एकुण १८७ वृक्षांची लागवड करण्यात आली. देशात व राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना सामाजिक बांधिलकी जपत व कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या सुचना व नियमाचे काटेकोर पालन करत वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.
 
 

NBR_Shahada_Vruksharrapan 
 
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता.अलिबाग, जि.रायगड) संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने नंदुरबार जिल्ह्यात तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय बी.पाटील यांच्या हस्ते एकुण ७७ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच अनु.जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, शहादा येथील परिसरात एकुण ११० वृक्षांची लागवड करण्यात आली.
 
 
मानवता हाच धर्म व मनुष्य हिच जात आणि मानवसेवा हिच ईश्वरसेवा मानून समाज परिवतर्नाचा वसा घेतलेल्या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या डोंगराळ व दुर्गम असणार्‍या जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धन, स्मशानभुमी व कब्रस्थान स्वच्छता, ग्रामस्वच्छता, विहीर व बोअरवेल जलपुनर्भरण व रक्तदान शिबीर यासारखे उल्लेखनीय व स्तुत्य उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. वृक्ष लागवडीप्रसंगी तळोदा येथे डॉ.विजय पाटील व रुग्णालय कर्मचारी व मोहिदेतर्फे शहादा येथे शाळेचे मुख्याध्यापक समाधान देवरे, पर्यवेक्षक राकेश माळी, शिक्षक बाळासाहेब नागरे, पंकज शिरसाठ व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.