अजय देवगनच्या ‘भूज’ मधील सोनाक्षीचा दमदार लूक !

    दिनांक : 18-Jul-2020
Total Views |
 
 
अजय देवगनच्या ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’ बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूक पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे त्याचे रिलीज पुढे ढकले असून निर्मात्यांनी सिनेमा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. आता तो डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. ‘भूज’ सिनेमातील अजय देवगन आणि संजय दत्त यांचा लूक यापूर्वी रिलीज करण्यात आला होता. आता सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आलाय.
 
SONAKSHI _1  H
 
 
 
सोनाक्षी सिन्हाचा लूक सोशल मीडियावर शेअर करताना ट्विटमध्ये अजय देवगनने लिहिले आहे की, सिनेमात सोनाक्षी सिन्हाने सुंदरबेन जेठा मधरपर्‍या ही भूमिका साकारली असून ती एक समाजसेविका आहे. तिने 299 महिलांसह 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भुज एअरपोर्टवर इंडियन एअर फोर्सची मदत केली होती. या भूमिकेसाठी सोनाक्षीचा लूक अत्यंत योग्य वाटतो.
 
 
यात संजय दत्तसह नोरा फतेही झळकणार असून या चित्रपटातील नोराची भूमिका पूर्वी परिणीति चोप्रा साकारणार होती. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची मागणी अजय देवगनचे चाहते करीत आहेत, परंतु कोविड-19 च्या संकटामुळे तो ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.