पाचोर्‍यात वाहतुकीची कोंडी

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
 
मानसिंगका कॉर्नर-शिवाजीनगर परिसरात वाहतुकीसह रुग्णवाहिकेलाही अडथळा
 
 
पाचोरा : येथील मानसिंगका कॉर्नर-शिवाजी नगर या मार्गावर मंगळवारी तब्बल एक तास ट्राफिक जाम झाली. यामुळे वाहनधारक व नागरिकांचे चांगलेच हाल झाले. या मार्गावर हा प्रकार नित्याचाच आहे. रॅक लागला की मालधक्यावरून मालवाहू ट्रकद्वारा माल वाहतूक केला जातो. वाहनांमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यात दोन्ही बाजूला व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळेही त्यात जास्त कोंडी होत असते.
 
 

Pachora_Kondi_1 &nbs
 
ट्राफिकमध्ये चक्क अंबुलन्ससुद्धा अडकली होती. चक्का जाम झाल्यामुळे एखाद्या वेळेस रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चक्क अंबुलन्स चालकास खाली उतरून मार्ग काढीत वाहन पुढें न्यावे लागले. नागरिकांना पायी देखील चालायला रास्ता राहत नाही. मालवाहू रॅक लागल्यानंतर ही वाहतूक रात्रीच्या वेळी झाल्यास दिवसा वाहतुकीची कोंडी होणार नाही. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून दिवसा ट्राफिक जाम होणार नाही. पमागील काही दिवसांपूर्वी याच मार्गावर गोराडखेडा येथील वृद्ध ट्रकच्या चाकाखाली आल्याने ठार झाल्याची घटना घडली आहे. वाहतुकीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.