निखिल ढाके यांनी साकारला ८० हायब्रीड जांभळाच्या वृक्षारोपणातून संकल्प

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
न्हावी, ता.यावल : येथील आयटीआयचे शिक्षक निखिल ढाके यांनी मागील वर्षीच असा संकल्प केला होता की आपण यपुढच्या वर्षी वृक्षारोपण करायचे तर त्यांनी घरीच छोटी नर्सरी करुन त्यात हायब्रीड जांभळाचे ८० रोपे स्वखर्चाने बनवले व ती रोपे सरकारकडून कोणतीही अपेक्षा न करता स्वतः व फिरके वाड्यातील तरुणांनी न्हावी कारखाना रोडवर जांभळाच्या ८० झाडांचे वृक्षरोपण केले. त्यांच्या संगोपनाची सर्वस्वी जबाबदारी चेतन वाघुळदे, युवराज भंगाळे, भागेश भंगाळे, कल्पेश फिरके, गंगाराम बोरोले, सौरभ पाटील, पुरुषोत्तम चौधरी, योगेश ढाके यांनी घेतली आहे.
 

Nhavi Vruksharopan_1  
 
यावेळी न्हावी ते कारखाना रस्त्यावर वृक्षारोपण करताना निखिल ढाके, पुरुषोत्तम चौधरी, युवराज चौधरी, भागेश भंगाळे, योगेश ढाके, कल्पेश फिरके, गंगाराम बोरोले आदींची उपस्थिती होती.