डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मानले आभार

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |

Pachora_Bhushan Magar_1&n 
 
 
पाचोरा : सद्यस्थितीत संपुर्ण देशामध्ये कोविड-१९ (कोरोना) महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांनी त्यांचे हॉस्पिटल क्वारंटाईनसाठी खुले करून दिले तसेच हजारो लोकांची ओपीडी मोफत केली म्हणून डॉ. भूषण मगर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत केलेल्या कार्यासाठी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांनी पत्राद्वारे आभार व्यक्त करण्यात आले तसेच भविष्यातही माझ्या शुभेच्छा सोबत राहतील, असेही म्हटले आहे.