वडीलांच्या स्मरणार्थ शिक्षक मुलाने केली ६५ रोपांची लागवड

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
देवगाव जि.प.शाळेच्या आवारात वृक्षारोपण 
 
 
पारोळा : तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या तसेच देवगाव वस्तीशाळेच्या आवारात वडीलांच्या स्मरणार्थ शिक्षक मुलाने वडीलांची आठवण सदैव जिवंत राहवी म्हणून ६५ वृक्षांची लागवड केली आहे.
 
 

Parola Devgaon_1 &nb 
 
 एक महिन्यापूर्वी देवगाव येथील भिका (संभाजी) मांगो पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. वडीलांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्य व्हावे या उद्देशाने करमाड विद्यालयाचे शिक्षक तथा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक नंदकुमार पाटील व शिवरे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी कैलास (आप्पा) पाटील या मुलांनी ६५ वृक्षांची लागवड करुन वृक्षांसाठी जाळ्याही उपलब्ध करुन दिल्यात.तसेच देवगाव जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत तुटलेली होती त्या ठिकाणी स्वखर्चाने भराव करुन दिला.
 
 
 
 यावेळी उपसरपंच समीर पाटील, एरंडोल प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील, पोलीस पाटील विश्वास शिंदे, ग्रा.पं.सदस्य दिपक पाटील, केंद्रप्रमुख एच.एस.पवार, अरुण पाटील, अभिजीत पाटील, अमोल निकम, नंदकुमार पाटील, एकनाथ पाटील, प्रदिप पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटील, कैलास पाटील, सुपडू पाटील, जि.प.शाळेचे शिक्षक शैलेश गिरासे, दिपक पाटील, मनोहर शिंपी, वैशाली जोशी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी आदी उपस्थित होते.
वृक्ष जतन होईल तोपर्यंत देखभाल - नंदकुमार पाटील वृक्षांची फक्त लागवड नाहीतर संवर्धन करण्यासाठी जाळ्या, पाण्याची व्यवस्था व वृक्ष जतन होईल तोपर्यंत देखभाल करणार असल्याचे नंदकुमार पाटील यांनी सांगितले.