आयान शुगरची गाळपाची तयारी; तोडणी, वाहतूक यंत्रणांचे करार पूर्णत्त्वास

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
 
नंदुरबार : समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यात २२ ते २३ लाख टन ऊस उपलब्ध आहे. पैकी दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सलग तीन वर्ष दुष्काळामुळे मागील वर्षी ऊस टंचाईचा फटका बसला. मागील वर्षी व याही वर्षी सुरुवातीलाच वरुण राजाने कृपादृष्टी दाखवली. डिसेंबर-२०१९ पासून ऊसाच्या लागवडी वाढल्या. आगामी हंगामासाठी जिल्ह्यातून कारखान्याकडे आजपर्यंत १२ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
 
NBR_Sugar_1  H
 
मान्सूनपूर्व पावसानेही चांगली हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस झाला तर ऊसाचे वजन वाढेल. जिल्हात २२ ते २३ लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. आयान शुगर ने मागील हंगामातील एफआरपी पेक्षा जास्त एकरकमी केन पेमेंट तसेच वाहतूक व तोडणीची सर्व बिले अदा केली असून आगामी गाळप हंगाम २०२०-२१ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठी ऊस नोंदी, ऊस तोडणी, वाहतुक व हार्वेस्टर यंत्रणांशी शेतकी विभागामार्फत ऑनलाईन करार सुरु आहेत. २०० ट्रक, १५० ट्रक्टर, २०० ट्रक्टर टायर, ४५० बैलगाडी व ६ हार्वेस्टर कंत्राटदारांचे करार पुर्ण झाले असून या महिन्यात तोडणी-वाहतुक यत्रणांचा ऍडव्हान्सचा पहिला हप्ता देण्याचे नियोजन आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी.बडगुजर, मुख्य शेतकी अधिकारी ए.आर.पाटील व ऊस पुरवठा अधिकारी के.जी.मराठे यांनी दिली.
 
 
कारखान्याची दैनिक गाळप क्षमतावाढ व आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच नवीन वीज निर्मिती प्रकल्प व आत्याधुनिक इथेनॉल प्रकल्पाचे काम देखील चालू आहे. नवीन आत्याधुनिक मशिनरी असल्याने भरपूर प्रमाणात ऊसाचे गाळप होईल. येत्या गळीत हंगामापासुन सर्व प्रकल्प कार्यान्वित होतील, अशी माहिती कारखान्याचे संचालक एस.एस.सिनगारे यांनी दिली. यावेळी आयान शुगर कारखान्यात मिल पूजनप्रसंगी मुख्य कायकारी अधिकारी आ.सी.बडगुजर, चिफ केमिस्ट एन.डी.पाटील, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील, चिफ अकौंटंट पी.बी.टापरे, डिस्टिलरी मॅनेजर पी.पी.भामरे सिव्हील इंजिनीअर के.जी.कदम आदींची उपस्थिती होती.