धरणगावला १५ रुग्णांची केली कोरोनावर मात

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
धरणगाव : येथील कोविड सेंटरला पंधरा रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
 

Dharangaon_Corona_1  
 
चार वर्षांच्या मुलानेही केली कोरोनावर मात
बाभोंरी बु. येथील हितेश विनोद पाटील या ४ वर्षाच्या कोरोनाबाधित रुग्णानेही कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्याचे शासकीय समन्वय समिती अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी हितेशला पेढा देवून कौतुक केले.
 
 
येथील कोविड सेंटरला बुधवार १५ रोजी पंधरा रुग्णांनी कोरोनावर मात करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्या सर्वांना पेढा देऊन व टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. त्यामध्ये पाळधी-९, बाभोंरी बु.-४, धरणगाव-२ असे एकुण पंधरा रुग्ण होते. पाळधी बु. येथील रुग्ण नाशिर बशीर पिंजारी यांनी धरणगाव कोविंड सेंटरला अत्यंत चांगली सुविधा मिळत असल्याचे बोलताना सांगून समाधान व्यक्त केले.
 
  
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शासकीय समन्वय समिती अध्यक्ष गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार नितिनकुमार देवरे, बी बियाणेचे मोठे व्यापारी किशोर डेडिया व सुनिल मालु हे मदत व सहकार्य करण्यासाठी हजर होते.
 
 
 
कोविड सेंटरची सक्षमपणे जबाबदारी सांभाळणारे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी चोख व्यवस्था ठेवली होती, यावेळी धरणगाव मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी अनिल सुरवाडे, कोतवाल तबरेज खाटीक, अरविंद चौधरी, गोपाल पाटील, गोपाल चौधरी आदी उपस्थित होते.