फैजपूर शहरवासीयातर्फे न्हावी ग्रामीण, कोविड रुग्णालय सेंटरला ऑक्सिजन पाईपलाईन सुविधा उपलब्धतेचा संकल्प

    दिनांक : 14-Jul-2020
Total Views |
 
 
ऑक्सीजन सुविधेसाठी मदतीचे आवाहन, ३० बेडची होणार सुविधा
 
 
फैजपूर, ता.यावल : फैजपुर विभागाचे कोविड -१९ सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालय न्हावी येथे ३० बेड उपलब्धता साठी ऑक्सिजन पाईपलाईन ची सुविधा शहरवासीयांच्या लोकसहभागातून निर्माण व्हावी अशी अपेक्षा फैजपुर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी नपा सभागृहात घेतलेल्या बैठकीत आवाहन केल्यानुसार उपस्थित मान्यवरांनी त्यास तडीस नेण्याचा संकल्प केला आहे.
 
 

Faizpur_Oxygen_1 &nb 
 
 
ही सुविधा आठवडाभरातच सुरू करण्याचा मानस आहे. तहसीलदार जितेंद्र कुमार यांच्या व्हाईट लिली काव्यसंग्रहातील कविता मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल त्यांचा उपस्थितांतर्फे भरत महाजन यांनी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या यामुळे फैजपूर विभागातील केविडसह अन्य गंभीर रुग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे. हे गंभीर रुग्ण जळगाव येथे हलवितानाच रस्त्यातच मृत्यू होण्याचा मोठा धोका टळणार असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार आहे. यावेळी उपस्थितांनी हा खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या सहयोगातून याठिकाणी व्हेंटिलेशनची सुविधा उपलब्ध करून मिळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उचित कार्यवाही करून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करावी अशी विनंती मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधीना केली आहे.
 
 
 
याप्रसंगी तहसिलदार जितेंद्र कुवर ,मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सातपुडा व लक्षमी पतसंस्था चेअरमन नरेंद्र नारखेडे, जिल्हा दुध संचालक व नगरसेवक हेमराज चौधरी, पं.स. यावल माजी सभापती भरत महाजन, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, देविदास चौधरी पतसंस्था चेअरमन चंद्रशेखर चौधरी, मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष अनिरुद्ध सरोदे ,पत्रकार संघटना अध्यक्ष योगेश सोनवणे ,व्यापारी असोशियन अध्यक्ष संजय सराफ, युवराज चौधरी आदींची उपस्थिती होती.