पारोळ्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचादर ८२ टक्के : प्रांताधिकारी विनय गोसावी

    दिनांक : 11-Jul-2020
Total Views |

parola_1  H x W
नव्याने २२ रुग्ण कोरोनामुक्त; शहरवासीयांना दिलासा
तभा वृत्तसेवा
पारोळा
शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्णसंख्या जसे वाढत जात आहे.तसे रुग्ण बरे ही होत असल्याने पारोळा वासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.शनिवारी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आजतागायत एकूण २८७ रुग्णांनी झुंज देवून कोरोनावर मात केली असून बरे होण्याचा दर ८२ टक्के असल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मात्र अश्या परिस्थितीत बरे होणार्‍याची संख्याही समाधानकारक असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी नव्याने २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यात १८ पारोळा कोविड सेटरमधील तर ४ रुग्णांना नाशिक येथून डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे,डॉं.योगेश साळुंखे, डॉं चेतन महाजन,शहर तलाठी निशिकांत पाटील,म्हसवे तलाठी गौरव लांजेवार उपस्थित होते. शहरासह ग्रामीण भागातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४९ झाली असून त्यापैकी २८७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्यास्तिथीला ४६ रुग्णावर उपचार सुरू आहेत त्यात पारोळा कोविड सेंटर १९,जळगाव १४,धुळे २,नाशिक ३,मुंबई १,खाजगी ६,चोपडा १ येथे उपचार सुरू आहेत.
२८७ रुग्णांची कोरोनावर मात
आजतागायत शहरासह ग्रामीण भागातील सुमारे २८७ रुग्णांनी कोरोनाला यशस्वी झुंज देत कोरोनावर मात केली असून आज नव्याने २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.ही बाब शहर वासीयांची काही प्रमाणात चिंता मिटवणारी आहे.परिणामी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.एकूण पॉझिटिव्ह संख्या ३४९ झाली असून २८७ रुग्ण बरे झाले असून त्यात १६ मयत झाले आहेत.